Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

औरंगपुर   हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभू श्री.राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.औरंगपुर व श्रीरामपूर असे गों गावे मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे  औरंगपुर  गावात हनुमान  मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या औरंगपुर गावाची लोकसंख्या सुमारे १८५१ व श्रीरामपूर गावाची लोकसंख्या ८८८ आहे.दोन्ही गावामिळून एकूण २७३९ इतकी लोकसंख्या आहे . गावामध्ये अहिल्याबाई च्या काळातील अहिल्यादेवी होळकर यांची पुरातन बाराव आहे, सदर बारावाला पायरी आहेत चढण्या उतरण्यासाठी पूर्वी लोक त्या बारावरून पायऱ्या उतरून चढून पाणी भरत होते. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १,सभामंडप-२ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत औरंगपुर  ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात, तसेच  गावात पुरातन बारव असून  तसेच  मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच भरपूर शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात.

औरंगपुर  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. व गावाला घरकुल योजनेचा बक्षीस सुद्धा मिळाले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत औरंगपुर  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये  औरंगपुर ला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम यशस्वीपणे राबवली आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच वसदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

औरंगपुर  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

औरंगपुर  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५४ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ६७५ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण 350 व श्रीरामपूर  कुटुंबे १२५ एकूण ४७५ कुटुंब  येथे वास्तव्यास असून, औरंगपुर लोकसंख्या १८५१  आहे. त्यामध्ये ९४९  पुरुष व ९०२  महिला यांचा समावेश होतो. श्रीरामपूर  लोकसंख्या ८८८  आहे. त्यामध्ये ४६५  पुरुष व ४२३  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत सरस्वती नाला नदी असून  गावातून कडवा पाट जात असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. किंवा त्यापेक्षा पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

औरंगपुर  गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

औरंगपुर  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

औरंगपुर  च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

गावाचे नाव एकूण लोकसंख्या पुरुष स्त्रिया
औरंगपुर १८५१ ९४९ ९०२
श्रीरामपूर ८८८ ४६५ ४२३

संस्कृती व परंपरा

औरंगपुर  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात प्रभू हनुमान  यांच्या जन्मापासून सप्ताह मोठ्या उत्साहात १५ दिवस भरवली जातो त्यात प्रामुख्याने प्रभू हनुमान  यांचा जन्मदिवस हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे औरंगपुर  गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत खंडेराव महाराज  मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी यात्रा  आयोजित केले जातात.

बारव – गावाच्या पश्चीम  भागात असलेले हे पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर बारव ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

शेती क्षेत्र व द्राक्षबागा – औरंगपुर  द्राक्ष उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

औरंगपुर  गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे औरंगपुर शी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

भेंडाळी ,सायखेडा,चाटोरी,रामनगर(बेरवाडी),सोनगाव, औरंगपुर, भुसे, श्रीरामपूर, करंजगाव, भुसे, म्हाळसाकोरे हि गावे औरंगपुर च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ. क्र. नाव पद मोबाईल क्रमांक
सौ. अर्चना भाऊसाहेब खालकर सरपंच ९८५०६७३४९८
श्री. अशोक सोमनाथ माळी उपसरपंच ९७६७७९५७२३
सौ. सोनाली रामनाथ आढाव सदस्य ९९२१७३८६६५
सौ. निर्मला प्रकाश बागल सदस्य ९८५०३६०८३५
श्री. सचिन भाऊसाहेब माने सदस्य ९८२२००१९८८

लोकसंख्या आकडेवारी


344
2739
1414
1325
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6